"अखंड सेवा, सक्षम नागरिक"

आमची यशोगाथा

ग्रामपंचायत पिंपळगाव लेप, येवला – निसर्गाच्या कुशीतलं एक जिवंत चित्र

नाशिक-येवला  राज्य मार्गाच्या गडद रेषेपासून थोडं पूर्वेकडे वळलं, की तिथं साक्षात निसर्गाचं एक अव्यक्त सुंदर रुप भेटतं ,खतवड गाव. सुमारे ४०९ लोकवस्तीचं हे गाव बाणगंगा नदीच्या काठावर निवांतपणे विसावलेलं आहे. गावाचं स्वरूप लहान, पण त्याची ओळख मोठी इथली माणसं, संस्कृती, निसर्ग, सृष्टी आणि श्रम यांचं एक अनोखं संमीलन इथे दिसतं.

धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख
खतवडची एक खासियत म्हणजे एकच ग्रामदैवताचं मंदिर, पण त्यात आहेत दोन हनुमान मूर्ती . ही दोन मूर्ती केवळ धर्माच्या नाहीत, तर सामाजिक समभावाच्या प्रतीक आहेत.
इथे दोनच मोठे समाज आदिवासी आणि मराठा, पण दोघेही गुण्यागोविंदानं, आपुलकीनं, एका छताखाली नांदतात. गावात वादाच्या नाही, तर एकोप्याच्या गोष्टी ऐकायला मिळतात.

उत्पन्नाचे स्रोत: श्रमशीलतेचं गाव

गावकऱ्यांची मुख्य जीवनरेखा म्हणजे शेती आणि मोलमजुरी.
गावाचा पूर्व भाग म्हणजे एक बागायती शेताचं स्वप्न,वाघाड कालव्य मुळे इथे शेती भरभराटीला आली आहे. द्राक्ष,भाजीपाला ,कांदा,वेलवर्गीय पिकं,  यासारख्या पिकांची हिरवळ नजरेत भरते.तर गावाचा पश्चिम भाग मात्र वेगळ्या वाटेवर ,तिथं औद्योगिक वसाहत उभी राहत आहे. ही नवी दिशा गावाच्या भविष्याला नवी पहाट देणारी आहे. रोजंदारी, लघुउद्योग, प्रशिक्षण केंद्रं अशी काही स्वप्नं तिथं मूळ धरू लागली आहेत.
       

प्रगतीच्या वाटेवर- ग्रामपंचायत पिंपळगाव लेप, येवला

औद्योगिकीकरण येतंय, पण परंपरा जपली जातेय. इथं मातीचा गंध आहे, पण त्यात यंत्रांचं सूर मिसळू लागलाय. इथं देवळात दोन मूर्ती आहेत, पण गावाच्या हृदयात एकच माणुसकी आहे. खतवडचं नाव मोठ्या नकाशावर असो वा नसो, पण एक-ना एक दिवस नक्कीच गाव नावा रूपास आणण्याची ग्रामपंचायतचे उत्साही सरपंच,उपसरपंच,ग्रा.प अधिकारी    व सदस्य मंडळ व ग्रामस्थ खुणगाठ मनाशी बाळगून असल्याचे दिसून येत आहे . संकलन-सुकदेव खुर्दळ-उपसरपंच ग्रामपंचायत खतवड, बाणगंगा नदी गावाच्या पायथ्याशी वाहते,तर मोती नाला गावाला वळसाघालून सौदर्यात भर घालतो, कधी शांत, कधी खळखळाट करणारे नदी-नाले पावसाळ्यात ही गावाच्या साक्षीने नाचते,  इथली माती म्हणजे गावकऱ्यांचं गर्भसंपन्न बँक खाते. त्यात मोलमजुरीचा घाम, शेतीचा कष्ट आणि भविष्याचं रोपटं रुजवलेलं आहे. आणि हे सगळं सांभाळणारे माणसं प्रेमळ, सहकार्यशील आणि जिद्दी.

प्रशासकीय संरचना


पदाधिकारी


भारतातील पंचायती राज हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक आहे.

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा,,,

लोकसंख्या आकडेवारी


403
1,096
1141
971

Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo